Aishwarya Rai: आयव्हरी रोज ड्रेसमध्ये ऐश्वर्या रायचा एलिगंट अंदाज; विंटेज हॉलीवूड स्टाइलची चाहत्यांना आठवण
Aishwarya Rai कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायच्या प्रत्येक लूकने चाहत्यांचे आणि फॅशनप्रेमींचे लक्ष वेधले होते. मात्र, समारोपानंतर तिचा आणखी एक नवा लूक समोर येईल, अशी अपेक्षा चाहत्यांना नव्हती. त्यामुळे तिचे नवीन फोटो पाहून अनेकांना सुखद धक्का बसला.

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय बच्चन हिने पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश आणि एलिगंट लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ संपल्यानंतर अभिनेत्रीचा आणखी एक खास लूक समोर आला असून, तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयव्हरी रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये ऐश्वर्या राय अतिशय सुंदर दिसत असून, तिच्या या लूकची तुलना चाहत्यांनी विंटेज हॉलीवूड स्टाइलशी केली आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2026 ) ऐश्वर्या रायच्या प्रत्येक लूकने चाहत्यांचे आणि फॅशनप्रेमींचे लक्ष वेधले होते. मात्र, समारोपानंतर तिचा आणखी एक नवा लूक समोर येईल, अशी अपेक्षा चाहत्यांना नव्हती. त्यामुळे तिचे नवीन फोटो पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. (Aishwarya Rai)
या फोटोंमध्ये ऐश्वर्या आयव्हरी रंगाच्या खास ड्रेसमध्ये बाल्कनीत उभी राहून पोझ देताना दिसत आहे. तिच्या ड्रेसवर मोठ्या फ्रिल्सची डिझाईन करण्यात आली असून, ती गुलाबाच्या पाकळ्यांसारखी दिसत आहे. त्यामुळे हा ड्रेस अधिक आकर्षक आणि हटके वाटत आहे. साधेपणातही रॉयल लूक कसा असू शकतो, याचे उत्तम उदाहरण ऐश्वर्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. (Aishwarya Rai)
View this post on Instagram
फक्त ड्रेसच नाही तर तिचा मेकअपही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. ऐश्वर्याने या लूकसाठी सबटल मेकअप निवडला होता. स्मोकी आय मेकअपने तिचे डोळे अधिक उठून दिसत होते, तर न्यूड लिपस्टिकमुळे तिच्या संपूर्ण लूकला क्लासिक टच मिळाला. अनेक चाहत्यांनी तिच्या या स्टाइलला “विंटेज हॉलीवूड ग्लॅमर” असे संबोधले आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाल्यापासूनच ऐश्वर्या रायच्या रेड कार्पेट लूकची चाहत्यांना उत्सुकता होती. सुरुवातीला तिच्या उपस्थितीबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. मात्र, फेस्टिव्हल संपण्याच्या काही दिवस आधी ती कान्समध्ये पोहोचली आणि त्यानंतर तिच्या लूकने सोशल मीडियावर धूम उडवली. (Aishwarya Rai)
ऐश्वर्या रायचा हा आयव्हरी रोज ड्रेस लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिच्या सौंदर्याचे, आत्मविश्वासाचे आणि स्टाइल सेन्सचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. अनेकांनी तिला “टाइमलेस ब्युटी” असेही म्हटले आहे. (Aishwarya Rai)





