‘ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा,अन् चिकने व्हा, मग जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल’ शिंदे सरकारच्या मंत्र्याचं गजब विधान

Updated On:

मुंबई – अभिनेत्री  ऐश्वर्या रायचे डोळे जगभर प्रसिद्ध आहेत. तिचे चमकणारे डोळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा तिचे डोळे चर्चेत आले आहे. यावेळी राज्यातील  शिंदे सरकारमधील आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांनी अभिनेत्रींच्या डोळ्यांवर केलेले विधान चर्चेत आले आहे.

विजय कुमार गावित यांनी वादग्रस्त विधान करून वादाला फोडणी दिली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय ही मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. तुम्हीही मासे खाऊन डोळे सुंदर करा. म्हणजे जिला पटवायचे तिला पटवता येईल, असं वादग्रस्त आणि धक्कादायक विधान विजय कुमार गावित यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून सध्या नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावित यांनी हे विधान केलं. त्यावेळी मंचावर डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रॉयचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील. जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल, असे वादग्रस्त विधान विजयकुमार गावित यांनी केले आहे. दरम्यान मंत्र्यानेच हे विधान केल्याने उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या आहे.

आणखी संबंधित बातम्या

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

2026-10-04 14:53:43

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

2026-10-04 13:16:25

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

2026-10-04 08:18:00

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

2026-10-03 16:37:22

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप