कॅटवॉकमध्ये मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकते ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन लहानपणापासूनच खूप लोकप्रिय आहे. फॅशन, लूक आणि स्टाईलच्या बाबतीत आराध्या तिची आई ऐश्वर्या रायवर गेली आहे. आराध्याचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आराध्याचा रॅम्पवर चालतानाचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
आराध्या बच्चनचा हा नवीन व्हिडिओ नसून खूप जुना व्हिडिओ आहे. ऐश्वर्या आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आराध्याने आई ऐश्वर्यासोबत बॅकस्टेजवर खूप मजा केली असल्याचे हा बॅकस्टेजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे.
View this post on Instagram
आराध्याचे कधी शालेय उपक्रम करताना तर कधी पालकांसोबत फिरतानाचे फोटो व्हायरल होतात. आता आराध्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती कॅटवॉक करताना दिसत आहे. आराध्याचा कॅटवॉक पाहता ती मोठ-मोठ्या अभिनेत्रीलाही यामध्ये मागे टाकत असल्याचे या व्हिडिओवरून दिसून येते. व्हिडिओमध्ये आराध्या पिंक कलरच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आराध्या बच्चनच्या या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत.





