मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्या पाठोपाठ सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी आता ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींचाही कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती अभिषेक बच्चनने ट्विटरवरून दिली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन आणि तीची आठ वर्षाची मुलगी आरध्या या दोघींनाही रूग्णालयांतून घरी सोडण्यात आलं असलं तरी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यावर उपचार सुरू असून ते दोघेही वैद्यकीय निरीक्षणाखाली रुग्णालयातच राहणार आहेत.
अभिषेकने ट्विट करत आराध्या आणि ऐश्वर्याचा करोना अहवाल निगेटीव्ह आल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर अभिषेकने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, असं ट्विटमध्ये अभिषेकने म्हटलं आहे.
Aishwarya Rai Bachchan, her daughter Aaradhya test negative for #COVID19; discharged from the hospital.
Abhishek Bachchan and Amitabh Bachchan to remain under medical observation. pic.twitter.com/O7atvsyghK
— ANI (@ANI) July 27, 2020
दरम्यान, 11 जुलै रोजी अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत त्यांना आणि अभिषेकला करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते. त्यांनंतर त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अभिषेकने ट्विट करत पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते. माझी आई जया बच्चन आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचेही अभिषेकने सांगितले होते.