नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऐश्वर्या राय यांचा आरोप आहे की, एक वेबसाइट तिच्या छायाचित्रांचा आणि एआय जनरेटेड चित्रांचा वापर करून त्यांची उत्पादने विकत आहे. हे कृत्य कायद्याने गुन्हा आहे. यामुळे तिच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. न्या. तेजस कारिया यांनी तोंडी संकेत दिले की, ते प्रतिवादींना इशारा देणारा अंतरिम आदेश पारित करतील. ऐश्वर्या राय यांच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील संदीप सेठी म्हणाले की, अभिनेत्री तिच्या प्रसिद्धी आणि वैयक्तिक अधिकारांचा वापर करू इच्छिते. काही पूर्णपणे अवास्तव छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड केली जात आहेत. आरोपींना ऐश्वर्या रायचाचे फोटो किंवा व्यक्तिमत्त्व वापरण्याचा कोणताही अधिकार असू शकत नाही. एखादी व्यक्ती फक्त तिच्या नावावरून आणि चेहऱ्यावरून पैसे कमवत आहे. तिचे नाव एखाद्याच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरली जात आहे. हे खूप दुर्दैवी आहे. ऐश्वर्या राय यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांमध्ये प्रवीण आनंद आणि ध्रुव आनंद यांचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर रोजी संयुक्त रजिस्ट्रारसमोर आणि १५ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयासमोर पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण सूचीबद्ध केले आहे.