Aishwarya Bachchan : लाल साडीतील लूकने वेधलं लक्ष, ऐश्वर्या बच्चनचे जुने फोटो व्हायरल
Aishwarya Bachchan : या फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे ऐश्वर्याच्या भांगेतील कुंकू होते. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेले कुंकू तिने आपल्या भांगेत लावल्याचे फोटोंमधून दिसत आहे.

Aishwarya Bachchan : श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरात गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी लालबागच्या राजाच्या चरणी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतले.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाली. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, ऐश्वर्याच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाचे काही जुने फोटोही व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. डोक्यावर पदर, कपाळावर टिकली, भांगेत कुंकू आणि हातात बांगड्या या पारंपरिक लूकमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. या फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे ऐश्वर्याच्या भांगेतील कुंकू होते. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेले कुंकू तिने आपल्या भांगेत लावल्याचे फोटोंमधून दिसत आहे.
तिच्या या भक्तिभावपूर्ण कृतीचे चाहत्यांकडून कौतुक झाले होते. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले हे फोटो अलीकडचे नसून २०१७ सालचे आहेत. तिचे जुने फोटो आता पुन्हा चर्चेत आले आहेत. लाल साडी, डोक्यावर पदर आणि भांगेत कुंकू अशा पारंपरिक अंदाजातील ऐश्वर्याचा हा लूक त्यावेळी चाहत्यांना विशेष पसंत पडला होता.



