ऐश्वर्या आणि अभिषेकचा व्हिडिओ व्हायरल; ‘कजरा रे’ गाण्यावर धरला ठेका

Aishwarya And Abhishek | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या मध्यंतरी घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. यादरम्यान आता दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन सोबत त्यांची मुलगी आराध्या डान्स करताना पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक राहुल वैद्य गात असलेल्या ‘कजरा रे’ गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राहुल वैद्यने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राहुल वैद्यने या डान्स व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. “सर्वात नम्र रॉकस्टार अभिषेक बच्चन… सर्वात आकर्षक आणि सुंदर ऐश्वर्या राय यांच्यासोबत ‘कजरा रे’ गाणं,” असे कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बच्चन कुटुंब कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिषेक बच्चन लवकरच ‘हाऊसफुल 5’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हाऊसफुल 5’ चित्रपट 6 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या चारही भागांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर आता ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटाकडूंन प्रेक्षकांना मोठी अपेक्षा आहे.
हेही वाचा:
शेतकऱ्यांनो…! कृषी योजनांच्या लाभासाठी आता फार्मर आयडी महत्वाचा; सरकार देणार मोहिमेला गती





