ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

Aishwarya and Abhishek Bachchan | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र ऐश्वर्याने एका पोस्टद्वारे घटस्फोटाच्या अफवांचे खंडन केले आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 20 एप्रिल 2025 रोजी 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.
लग्नाच्या वाढदिवशी ऐश्वर्याने पती अभिषेक बच्चन व लेक आराध्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत होत्या. याच दरम्यान, या जोडप्याला एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
लग्नापूर्वी ऐश्वर्याचे सलमान खान आणि विवेक ओबरॉय यांच्यासोबत नाव जुळलं होतं. तर अभिषेकचेही राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत सुत जुळल्याची चर्चा होती. अभिषेकचा करिश्मा कपूरसोबत साखरपुडादेखील झाला होता, मात्र काही कारणास्तव त्यांचे नाते तिथेच तुटलं होतं. त्यानंतर जानेवारी 2007 अभिषेकने मध्ये झालेल्या ‘गुरु’ सिनेमाच्या प्रीमिअरनंतर ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं.
View this post on Instagram
अखेर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय 20 एप्रिल 2007 रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या भव्य विवाहाची खूप चर्चा झाली होती. त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. अनेकदा आराध्या आई ऐश्वर्यासोबत एकत्र कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे पाहायला मिळते.
हेही वाचा:
अश्विनी बिद्रे प्रकरणातील मोठी अपडेट समोर; आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर…





