पोर्टलॅन्ड (अमेरिका) – अलास्का एअरलाइन्सच्या विमानाने आज ओरेगोन येथे इमर्जन्सी लॅन्डिंग केले. विमानाची खिडकी आणि त्याच्या फ्युजलेजचा काही भाग हवेतच फुटल्यामुळे विमानाला इमर्जन्सी लॅन्डिंग करावे लागले. काही प्रवाशांनी याफुटलेल्या खिडकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
ही खिडकीची काच अचानक फुटल्यामुळे कोणी जखमी झाले का, हे समजू शकलेले नाही. हे विमान पोर्टलॅन्डवरून कॅलिफोर्नियातील ओन्टारिओ येथे जात होते. उड्डाण केल्यानंतर अर्ध्या तासातच ते परतले. इंधनाच्या पाईपचा मोठा भाग गायब असल्याचे प्रवाशांनी काढलेल्या फोटोमध्ये दिसते आहे. यामागील कारण विचारले असता फेडरल एव्हिएशन ऍथोरिटीने कोणतेही त्तर दिलेले नाही.