Flight Cancellations : जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत, काय आहे कारण?
Flight Cancellations : हिमवादळाच्या शक्यतेने तब्बल ८ हजार विमानांची उड्डाणे रद्द

Flight Cancellations : अमेरिकेत आगामी काही दिवसात येणाऱ्या हिमवादळाच्या शक्यतेने तब्बल ८ हजार विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
हिमवादळामुळे मोठ्या भागातला वीज पुरवठा खंडीत होण्याची भीती असून पप्रवाशांनाही विमाना ऐवजी रस्त्यावरच्या ने प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेबरोबर युरोपात न्यूमेक्सिकोपासून न्यू इंग्लंडपर्यंत तब्बल १४० दशलक्ष लोकांना या हिमवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Air traffic disrupted worldwide
या वादळामुळे टेक्सासपासून नॉर्थ कॅरोलिनापर्यंतच्या हजारो विमानांची उड्डाणे तात्पुरती स्थगित केली जाऊ शकतात. शुक्रवारी या हिमवादळाच्या परिणामाने टेक्सास, ओकलाहोमामध्ये गोठवणारे वारे वाहू लागले आणि त्याच्या जोडीने पाऊसही झाला.
दक्षिणेला गोठवणाऱ्या वाऱ्यानंतर हे वादळ इशान्येकडे सरकू शकते. यामुळे वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, बोस्टन पर्यंत तब्बल एक फुटापर्यंत बर्फ साचू शकते, असा अंदाज नॅशनल वेदर सर्व्हिसने वर्तवला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांसाठी सतर्कतेचे इशारे दिले आहेत.
आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. घरातच थांबा अशा सूचना नागरिकांना दिल्या गेल्या आहेत. शनिवारी ३,४०० हून अधिक उड्डाणे उशिरा झाली किंवा रद्द करण्यात आली. तर रविवारी ५,००० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

