एअर मार्शल आर.के.एस भदौरिया भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख
Updated On:

नवी दिल्ली: भारत सरकारने गुरुवारी एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांची भारतीय हवाई दलाच्या प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. आरकेएस भदौरिया हे सध्याचे एअर स्टाफचे प्रमुख आहेत. ३० सप्टेंबर रोजी बी.एस. धनोआ निवृत्त झाल्यानंतर एअर स्टाफचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील.
एअर मार्शल आरकेएस भदौरिया देखील बीएस धानोआच्या त्याच दिवशी निवृत्त होणार होते. परंतु भदौरिया यांना तीन वर्षाची मुदतवाढ मिळाली त्यामुळे वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत ते सेवेत राहतील.
टॅग्स:





