सर्व्हर डाऊन झाल्यामुळे एअर इंडियाच्या 137 विमानांना फटका
Updated On:

नवी दिल्ली – एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे या विमान कंपनीची 137 आंतरराष्ट्रीय आणि घरगुती उड्डाणे 197 मिनिटे सरासरीने विलंबित झाली असल्याचे एअर इंडियाने म्हंटले आहे.
एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे या विमान कंपनीची जगभरातील सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे जगभरातील विमानप्रवाशांचा मोठाच गोंधळ उडाला होता. या विमान कंपनीच्या संगणक सॉफ्टवेअर मध्ये ऍटलांटातील सीता कंपनीचा सॉफ्टवेअर आहे. तो अचानक बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हा प्रकार घडला. त्यामुळे बोर्डिंग पासेस प्रवाशानां देता आले नाहीत. त्यामुळे अर्थातच अनेक विमाने खोळंबून राहिली.
टॅग्स:




