Air India Plane Crash : डिस्चार्ज मिळताच विश्वासकुमारने भावाच्या मृतदेहाला दिला खांदा; पाहा Video

Ahmedabad । Air India Plane Crash : अहमदाबादमधील विमान अपघातातून वाचलेला एकमेव प्रवासी विश्वास हा त्याचा भाऊ अजयचा पार्थिब घेऊन गेला होता. विश्वास त्याचा भाऊ अजयसोबत अहमदाबादहून लंडनला जात होता. त्यादरम्यान विमान अपघात झाला.
विश्वास या विमान अपघातातून चमत्कारिकरित्या बचावला, तर त्याचा भाऊ अजयचा विमान अपघातातच मृत्यू झाला. भावाची पार्थिब घेऊन गेल्यानंतर विश्वास रमेश कुमार बराच वेळ रडत राहिला.
अपघातानंतर विश्वास कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याची प्रकृती सुधारली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच तो त्याच्या भावाच्या पार्थिबाच्या खांद्याला लागला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
#WATCH | Diu | Lone survivor of AI-171 flight crash, Vishwas Ramesh Kumar, mourns the death of his brother Ajay Ramesh, who was travelling on the same flight
Vishwas Ramesh Kumar is a native of Diu and is settled in the UK. pic.twitter.com/fSAsCNwGz5
— ANI (@ANI) June 18, 2025
दि. १२ जून रोजी, अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमान अहमदाबाद विमानतळाशेजारी असलेल्या बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या वसतिगृह इमारतीशी आदळले.
या अपघातात १२ क्रू मेंबर्ससह २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर वसतिगृह इमारतीतील ३४ जणांसह २७५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, रुग्णालय व्यवस्थापनाच्या मते, सर्व डीएनए चाचण्या झाल्यानंतर अंतिम मृतांचा आकडा स्पष्ट होईल.
या अपघातात माजी मुख्यमंत्री यांचाही मृत्यू झाला. विश्वास रमेश कुमार हे या अपघातातून वाचलेले एकमेव व्यक्ती आहेत. विश्वास रमेश कुमार हे मूळचे दीवचे रहिवासी आहेत आणि ते युकेमध्ये स्थायिक आहेत. त्यांच्या भावाशी त्यांचा डीएनए जुळल्यानंतर, अजयचा मृतदेह विश्वास यांच्याकडे सोपवण्यात आला.
विमानात बसलेल्या प्रवाशांव्यतिरिक्त, वसतिगृहात राहणारे वैद्यकीय विद्यार्थी आणि कर्मचारी यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. आतापर्यंत १७७ जणांचे डीएनए मॅचिंग झाले आहे तर १२४ जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला.





