अहमदाबाद विमान अपघात कसा झाला? समोर आले मोठे कारण ; सरकारने चौकशीसाठी दिली ३ महिन्यांची मुदत

Air India Plane Crash। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. मंत्रालयाने अपघातविषयी सांगताना, एअर इंडियाचे विमान एआय-१७१ अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर फक्त ६५० फूट उंचीवर पोहोचू शकले, त्यानंतर विमानाची उंची झपाट्याने कमी होऊ लागली.
पायलटने ‘मे डे’ कॉल केला होता
नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा यांनी, “उड्डाण घेतल्यानंतर विमानाची उंची फक्त ६५० फूट वाढली होती. त्यानंतर लगेचच विमानाची उंची कमी होऊ लागली आणि पायलटने दुपारी १:३९ वाजता एटीसीला ‘मे डे’ कॉल पाठवला. एका मिनिटातच विमान मेघनीनगरमधील मेडिकल हॉस्टेलच्या परिसरात कोसळले” अशी माहिती दिली.
अपघातापूर्वी कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती Air India Plane Crash।
समीर सिन्हा असेही म्हणाले की, अपघातापूर्वी विमानाने पॅरिस-दिल्ली-अहमदाबाद प्रवास कोणत्याही तांत्रिक समस्येशिवाय पूर्ण केला होता. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि सांगितले की त्यांनीही त्यांचे वडील रस्ते अपघातात गमावले आहेत, त्यामुळे ते पीडित कुटुंबांचे दुःख समजू शकतात.
समिती ३ महिन्यांत अहवाल सादर करणार
केंद्र सरकारने एअर इंडिया अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सचिवांच्या पातळीवरील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती अपघाताची कारणे तपासेल, विद्यमान SOP आणि मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेईल आणि भविष्यात अशा घटनांना तोंड देण्यासाठी व्यापक सूचना करेल.
ड्रीमलाइनरची चौकशी सुरू, ८ विमानांची चौकशी Air India Plane Crash।
DGCA च्या सूचनेनुसार, एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांची चौकशी सुरू आहे. भारतात एकूण ३४ ड्रीमलाइनर आहेत, त्यापैकी ८ ची चौकशी पूर्ण झाली आहे. अपघात झालेल्या विमानात २४२ लोक होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आणि फक्त एकच वाचला. विमान कोसळलेल्या मेडिकल हॉस्टेल कॉम्प्लेक्समध्ये २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.





