Air India plane bomb threat : अहमदाबाद येथील विमान अपघाताची बातमी ताजी असतानाच आता एअर इंडियाच्या विमानला बॅाम्बची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. बॅाम्बची धमकी मिळाल्यानंतर नवी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाचे थांयलंडमध्ये आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ हा निर्णय घेण्यात आला. विमानातील सर्व प्रवासी आणि आणि क्रू सदस्य सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या विमानात एकूण १५६ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या एआय ३९७ या विमानाने सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी फुकेतवरून उड्डाण घेतले होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटानंतर विमानात बॅाम्ब असल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे पायलटने विमानाचे एमर्जन्सी लँडिग केले.