Air India : अपघातातील मृतांना एअर इंडियाच्या कर्मचार्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : एअर इंडियाच्या विमान एआय 171 च्या अपघातात प्रवाशाबरोबरच 12 विमान कर्मचार्यांना देखील प्राण गमवावे लागले. कायमच्या दुरावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे सहकर्मचारी एकत्र आले. एअर इंडियाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले, हे नुकसान आपल्या प्रत्येकाच्या हृदयात कायम सलत राहील.
आपल्या सहकर्मचार्यांच्या कर्तव्यपूर्तीचा आणि साहसाचा आदर राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. 30 वर्षे ज्यांनी सेवकर्तव्य चोख बजावले असे कॅप्टन सुमीत सभरवाल ताणतणावाच्या प्रसंगी देखील एक शांत स्मितहास्य करीत. कॅप्टन सुमीत यांनी युनिफॉर्म फक्त परिधान केला नाही तर त्याचा सन्मान उंचावला. अवघ्या 26 वर्षांचे फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे त्यांच्या बॅचमित्रांसाठी एक सहकर्मचारी नव्हते. तो आमचा खूप लाडका भाऊ होता, असे सहकारी म्हणाले.





