Air India Emergency Landing: एअर इंडियाच्या विमानात हायजॅक अलर्ट ; दिल्लीऐवजी जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग
Air India Emergency Landing:

Air India Emergency Landing: फ्रँकफर्टहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2030 विमानाबाबत अपहरणाचा अलर्ट मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नेमकी घटना काय? Air India Emergency Landing:
समोर आलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या AI-2030 विमानाने मंगळवारी संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता फ्रँकफर्टहून दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले होते. हे विमान बुधवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे अपेक्षित होते.
मात्र, विमान प्रवासात असताना अपहरणासंदर्भातील सुरक्षा अलर्ट मिळाल्याने यंत्रणा सतर्क झाल्या. खबरदारी म्हणून विमानाचा मार्ग बदलून जयपूर विमानतळावर त्याचे सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याची माहिती आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी Air India Emergency Landing:
विमान जयपूर विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा यंत्रणा, पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.
दरम्यान, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्याची अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही. अपहरणाचा अलर्ट नेमका कशामुळे मिळाला, याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेची अधिकृत माहिती आणि तपासाचे निष्कर्ष समोर आल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊ शकेल.






