एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा DVR सापडला ; अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? रहस्य उलगडणार

Air India DVR found । अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या दुसऱ्या दिवशी, गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केला. अपघाताची कारणे शोधण्यासाठी हा खूप महत्त्वाचा पुरावा मनाला जातो. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळलेल्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाच्या ढिगाऱ्यात DVR सापडला आणि तो जवळच्या निवासी भागात जाऊन पडला होता.
विमानाचा मागील भाग मेघानी नगरमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या युजी हॉस्टेल मेसवर पडला, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये उपस्थित असलेल्या २४ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. अनेक वैद्यकीय आणि नर्सिंग विद्यार्थी जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गुजरात एटीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘हा एक DVR आहे जो आम्ही ढिगाऱ्यातून शोधला आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) ची एक टीम लवकरच याठिकाणी पोहोचेल आणि उपकरणाची तपासणी करेल, ज्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या घटनांच्या क्रमाबद्दल महत्त्वाचे संकेत मिळू शकतील.” असे सांगण्यात आले आहे.
अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? Air India DVR found ।
DVR रिकव्हर केल्याने दुर्दैवी विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? याची माहिती गोळा करण्यास मदत होणार आहे. गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या या भीषण विमान अपघातात २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला. एअर इंडियाचे विमान एआय-१७१ २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी रवाना झाले. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनेडियन नागरिक होता, तर दोन वैमानिकांसह एकूण १२ क्रू मेंबर्स विमानात होते.
डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्समध्ये फरक आहे. अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यानंतर आता DVR (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) आणि ब्लॅक बॉक्स दोन्ही डेटा रेकॉर्ड करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, परंतु DVR सहसा सुरक्षा कॅमेऱ्यांमधून फ्लाइटचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तर ब्लॅक बॉक्स फ्लाइट डेटा आणि कॉकपिट ऑडिओ रेकॉर्ड करतो.
डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्समध्ये काय फरक ? Air India DVR found ।
डीव्हीआर पाळत ठेवण्यासाठी अनेकदा सुरक्षा कॅमेऱ्यांमधून व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करतात. DVR वरून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ डेटा सहसा हार्ड ड्राइव्ह किंवा क्लाउड स्टोरेजवर संग्रहित केला जातो. डीव्हीआर प्रामुख्याने व्हिज्युअल डेटा रेकॉर्ड करतो. ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) विमानाचा वेग, उंची, इंजिनचा जोर इत्यादी उड्डाण डेटा आणि कॉकपिट ऑडिओ (पायलट संभाषण) रेकॉर्ड करतो. ब्लॅक बॉक्समध्ये विशेष रेकॉर्डर वापरले जातात जे गंभीर अपघातातही सुरक्षित राहण्यासाठी डिझाइन केलेले असतात.





