धडधड वाढली ! पाकिस्तानवर कारवाई करण्यापूर्वी उच्चस्तरीय बैठक ; हवाई दल प्रमुखांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Air Force Chief meets Prime Minister। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकांचा धडाकाच लावला आहे. त्यातच भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीनंतर काही वेळाने, हवाई दल प्रमुख पंतप्रधान निवासस्थानाबाहेर पडले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दोन दिवसापूर्वी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही पंतप्रधानांची लोक कल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नौदल प्रमुखांनी पंतप्रधान मोदींसोबत एक तासाची बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांनी नौदलाच्या सध्याच्या तयारी आणि उपक्रमांची माहिती दिली.
पंतप्रधानांचा बैठकांचा धडाका Air Force Chief meets Prime Minister।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईची कमान हाती घेतली आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांवर भारताच्या संभाव्य कारवाईसाठी रोडमॅप तयार करण्यासाठी ते तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसोबत स्वतंत्र बैठका घेत आहेत.
२६ एप्रिल रोजी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. ही बैठक सुमारे दीड तास चालली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी सर्व दलांना पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.
३० एप्रिल रोजी, पाकिस्तानविरुद्ध कारवाईच्या शक्यतेदरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या ७ लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोभाल हे देखील उपस्थित होते.
पंतप्रधानांनी नौदल प्रमुखांची घेतली भेट Air Force Chief meets Prime Minister।
३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, जी सुमारे एक तास चालली. आज हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली, जी सुमारे ४० मिनिटे चालली. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की भारताच्या प्रत्युत्तराची वेळ, पद्धत आणि लक्ष्य हे सैन्याने स्वतः ठरवावे. या दिशेने येणारे सर्व अडथळे दूर करून, राजकीय नेतृत्वाने आता अचूक आणि संतुलित प्रतिसाद दिला जाईल असे संकेत दिले आहेत.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील लष्करी तयारी लक्षात घेता, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द केल्या आहेत. हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे जेव्हा राष्ट्रीय स्तरावर संरक्षण तयारी सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.
सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की देश दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध आहे. केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की पहलगाम हल्ल्यातील दोषींना आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल.
सैन्याला मोकळीक
सरकारने सशस्त्र दलांना पूर्ण ‘ऑपरेशनल स्वातंत्र्य’ दिले आहे जेणेकरून ते प्रतिसादाची पद्धत, वेळ आणि लक्ष्य ठरवू शकतील. सरकारचा कणखर हेतू आणि विरोधकांचा पाठिंबा हे दर्शवितो की येत्या काळात दहशतवादी घटनांविरुद्ध भारताचा प्रतिसाद निर्णायक ठरू शकतो.





