Igor Stimac sacked : AIFF घेतला मोठा निर्णय, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅक यांची केली हकालपट्टी..

Igor Stimac sacked :- अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने इगोर स्टिमॅक यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली आहे. स्टिमॅक यांच्या प्रशिक्षणाखाली भारत फिफा विश्वकरंडक २०२६ पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करू शकला नाही आणि आशियाई कप २०२४ च्या गट टप्प्यातून बाहेर पडला.
फिफा विश्वकरंडक २०२६ च्या पात्रता फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर महासंघाने हा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १६ जून रोजी बैठक घेतली. एआयएफएफचे उपाध्यक्ष एनए हरिस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
AIFF terminates the services of Head Coach Igor Stimac!
Read more details here 👉🏻 https://t.co/oHZpY9tr7T#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/fupnL5UrVS
— Indian Football Team (@IndianFootball) June 17, 2024
बैठकीला उपस्थित असलेले कार्यवाहक सरचिटणीस एम. सत्यनारायण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, फिफा विश्वकरंडक २०२६ पात्रता मोहिमेतील वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय संघाची खराब कामगिरी पाहता, एआयएफएफ सदस्यांनी एकमताने सांगितले की, नवीन मुख्य प्रशिक्षक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संघाला पुढे नेणे महत्वाचे आहे. स्टिमॅक यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याची नोटीस महासंघाने यांना बजावली आहे.
AIFF ने नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध केला सुरू , अर्ज मागवले
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) इगोर स्टिमॅक यांची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केल्यानंतर नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. बोर्डाने बुधवारी आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे अर्जाची माहिती शेअर केली.
📢 We’re Hiring
AIFF seeks an experienced Head Coach for the India Senior Men’s/U23 National Team.
For more details, visit:https://t.co/eIuZ5IvpDK#IndianFootball⚽️ #BlueTigers #WeAreHiring pic.twitter.com/znBdtQ8wdV
— Indian Football Team (@IndianFootball) June 19, 2024
तथापि, स्टिमॅक यांना तात्काळ प्रभावाने काढून टाकल्यामुळे भारतीय फुटबॉल संघटनेला मोठी किंमत मोजावी लागेल. स्टिमॅक हे जून 2026 पर्यंत करारबद्ध होते आणि AIFF ला आता त्याचा करार लवकर संपुष्टात आणण्यासाठी भरपाई म्हणून $360,000 (अंदाजे रु. 3 कोटी) द्यावे लागू शकतात.




