अहमदनगर – शेवगावमधील ग्रामपंचायतींवर महिला राज

शेवगाव -तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 7, भाजपने 3 तर जनशक्ती विकास आघाडी व अपक्ष प्रत्येकी एक ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत 12 पैकी 10 ग्रामपंचायतीत महिलांनी बाजी मारली आहे.
तालुक्यातील दहिगावने, जोहरापूर, खामगाव, भायगाव, प्रभू वाडगाव, खानापूर व रांजणी अशा सात ठिकाणी राष्ट्रवादीने तर अमरापूर, वाघोली व सुलतानपूर खुर्द या तीन ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. आखेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनशक्ती विकास आघाडीचे तर रावतळे कुरुडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी आज तहसील कार्यालय तहसीलदार छगनराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मतमोजणीसाठी सहा टेबल मांडण्यात आले होते.यावेळी तहसील कार्यालयाच्या परिसरात जमलेल्या विजयी उमेदवाराच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलाल उधळत आपला आनंद व्यक्त केला. मतमोजणीसाठी नायब तहसीलदार मयूर बेरड, प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार राहुल गुरव, महसूल सहाय्यक आनंद गुसिंगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
बारा ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे आहेत.
सुलतानपूर- सविता विजय फलके (सरपंच,भाजप). कविता शिरीष काळे, मच्छिंद्र एकनाथ डोईफोडे, सविता अशोक शिंदे, धनंजय सुरेश फलके, रवींद्र किशोर फलके, अमर शेषराव जाधव, सुमन बाळासाहेब मरकड. वाघोली – सुस्मिता उमेश भालसिंग (सरपंच, भाजप), राजेंद्र अशोक जमधडे, नलाबाई कार्लस आल्हाट, सुकदेव नाथा शेळके, हिराबाई रावसाहेब शिंगट, कल्पना पांडुरंग भालसिंग, मोहन बाबुराव गवळी, घनश्याम निवृत्ती वांढेकर, कांताबाई बबन बोरुडे, निर्मला गोरक्षनाथ दातीर. प्रभूवाडगाव – ज्ञानेश्वर निवृत्ती घोडेराव (सरपंच, राष्ट्रवादी), आजिनाथ माणिक जायभाय, अनिता श्रीकृष्ण बटुळे, मुक्ताबाई कचरू बटुळे, अर्जुन बाजीराव दराडे, मंदा राजेंद्र अंगरखे, अनिता गणेश बटुळे, दीपक त्रिंबक बटुळे, किरण बाबासाहेब कराड, मनीषा देविदास बटुळे. अमरापूर- आशा बाबासाहेब गरड (सरपंच, भाजप), मुस्तकीन युनूस शेख, समीर रफिक शेख, आशा बाबासाहेब गरड, गणेश शिवाजी बोरुडे, मनीषा दीपक क्षीरसागर, मनीषा रमेश खैरे, राम दत्तात्रय पोटफोडे, शोभा बाळासाहेब सुसे, सोमेश्वर अशोक खैरे, माया ज्ञानेश्वर म्हस्के, चंदाबाई विक्रम खैरे
खामगाव- विद्या अरुण बडधे (सरपंच, राष्ट्रवादी), विजय बबन तुजारे, दिगंबर भगवान बडधे, मीराबाई राजेंद्र घोलप, मोसिन पटेल, आयेशा फिरोज काझी, आशा कैलास जाधव, उमा सुभाष बडधे. आखेगाव- आयोध्या शंकर काटे (सरपंच, जनशक्ती आघाडी), संजय श्रीधर पायघन, रोहिणी बाबासाहेब गोरडे, निर्मला एकनाथ काटे, संजय विष्णू काटे, कौसाबाई अण्णासाहेब कोल्हे, मालन सिनाप्पा फुलमाळी, अशोक बन्सी गोरडे, अश्विनी नितीन खंडागळे, रवींद्र भाऊसाहेब ससाने, घनश्याम विठ्ठल पायघन, शारदा अरुण खर्चन. भायगाव- मनिषा राजेंद्र आढाव ( सरपंच, राष्ट्रवादी), अशोक प्रभाकर देशपांडे,
शांताबाई प्रकाश सौदागर, शोभा रामदास तांबोरे, सुभाष सोना सौदागर, आशा एकनाथ लांडे, दिपाली अनिल लांडे, सुरज खंडेराव देशपांडे, विठ्ठल घनश्याम पालवे, नर्मदा मोहन जगधने. रांजणी – काकासाहेब मुरलीधर घुले (राष्ट्रवादी), सोमनाथ भाऊसाहेब कर्डिले, योगेश्वर हरिभाऊ गवळी, सुरेखा संभाजी घुले, परशुराम रघुनाथ पवार, कमलबाई देवदत्त गायकवाड, सविता कैलास मोरे, अरुण केशव थोरात, अंजना संभाजी वाल्हेकर, शितल उद्धव चव्हाण
जोहरापुर- स्नेहल रोहन लांडे (सरपंच, राष्ट्रवादी), साहेबराव विश्वनाथ कुसारे, हिराबाई शंकर देवढे, मुक्ता महादेव ढगे, अनिल श्रीराम आढाळगे, शिवाजी सहदेव खेडकर, शोभा राजेंद्र पालवे, विष्णू निवृत्ती उगलमुगले, पपीता जालिंदर वाकडे, आशा बाळासाहेब उगलमुगले.
कुरुडगाव / रावतळे- चंद्रकला कल्याण कवडे (सरपंच, अपक्ष), रोहिदास कचरू नीळ, तुकाराम ज्ञानदेव औटी, भिमाबाई बाबासाहेब गोरडे, भाऊसाहेब छगन शिंदे, कल्पना अण्णासाहेब काळे, कस्तुराबाई कल्याण काळे, प्रशांत विनायक भराट, शितल भारत निळ, वर्षा नितीन भराट. खानापूर- शितल मंगेश थोरात (सरपंच, राष्ट्रवादी), योगेश अण्णासाहेब चेडे, अलका बबन आव्हाड, दिपाली कल्पेश दळे, रामदास रावसाहेब गोरे, आश्विनी शिवाजी भारस्कर, संगीता नानासाहेब चेडे, तात्यासाहेब बाप्पासाहेब थोरात, गणेश पंडित पातकळ, प्रीती उमेश मोरे. दहिगाव ने – सुनिता देवदान कांबळे. (राष्ट्रवादी), विष्णू ताराचंद खंडागळे, संतोष मोहन घुले, गोटीराम यशवंत काळे, सूर्यकांत लक्ष्मण पाऊलबुद्धे, चंद्रकला जगन्नाथ वीर, नसीम रशीद शेख, प्रयागा लक्ष्मण काशीद.





