नगर : थंडीचा कडाका वाढल्याने बाजारपेठेत आवक कमी झाल्याने भाजीपाला पुन्हा एकदा महाग झाला आहे. कांदा वगळता दुधीभोपळा, दोडके, भेंडी, गवार, काकडी, कारली, वांगी, घेवडा या भाज्यांच्या दरामध्ये दहा ते वीस टक्यांनी वाढ झाली आहे, तर तोंडली आणि शेवग्याचे दर दुपटीने वाढले आहेत. पालेभाज्यांच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. रविवारी बाजारपेठेत १८० गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. पालेभाज्यांच्या दरामध्ये देखील वाढ झाली असून मुळा आणि कांदापातीच्या जुडीचे दर दहा रुपयांच्या पुढे गेले आहेत. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याच्या दरामध्ये घट झाली आहे. परराज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढले आहे. मध्यप्रदेशमधून १३ ट्रक मटार, राजस्थानमधून १२ ट्रक गाजर, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातून १५ टेम्पो मिरची आणि कर्नाटकातून दोन ट्रक कोबीची आवक बाजारपेठेत झाली. येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कायम असून त्यामध्ये कोबी, फ्लॉवर, टॉमेटो, आले, सिमला मिरची, पावटा, कोबी, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, आले, पावटा, कांदा, बटाटा यांचा समावेश आहे. किरकोळ बाजारपेठेत कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, राजगिरा यांचे दर सहा ते सात रुपयांपर्यंत होते. कांदापात, मुळा आणि हरभराच्या जुडीच्या दर दहा रुपयांच्या पुढे होता. गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढल्याचा परिणाम भाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. थंडी वाढल्याने भाज्यांची आवक कमी झाली आहे. थंडीचा जोर असाच कायम राहिल्यास त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होईल आणि भाजीपाल्याचे दर तेजीत राहतील, असे भाज्यांचे व्यापारी यांनी सांगितले. कांदा उतरला कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे दर कमी झाले आहेत. किरकोळ बाजारपेठेत कांद्याची विक्री २० ते २५ रुपये किलो दराने सुरु आहे. मार्केटयार्डमधील घाऊक बाजारपेठेत रविवारी कांद्याच्या १०० गाड्यांची आवक झाली. घाऊक बाजारपेठेत दहा किलो कांद्याचा भाव १०० ते १५० रुपयांपर्यंत होता. थंडीचा कडाका वाढल्यामुळे बाजारपेठेत स्ट्रॉबेरीची मागणी वाढली आहे. रविवारी बाजारपेठेत चार टन स्ट्रॉबेरीची आवक झाली. मागणी वाढल्यामुळे स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. दोन किलो स्ट्रॉबेरीचा भाव १८० ते ३०० रुपये किलोपर्यंत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे कलिंगड, खरबूज या फळांची मागणी कमी झाली आहे. सफरचंद, मोसंबी, संत्रा, डाळिंब, बोरे या फळांचे दर तेजीत आहेत. यंदा लसणाची साठवण कमी आहे. मागील वर्षी १० ते २० प्रतिकिलो रुपयांनी बाजार भावाने लसूण विक्री केला जात होता. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लसणाचे पीक घेतले नसल्याने भारतात लसणाची आवक घटली आहे. घाऊकात २०० ते ३०० प्रति किलो रुपयांनी लसूण विकला जात आहे.