अहमदनगर – श्रीरामपूर खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी- विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली. 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज आल्याने आणि अर्ज भरण्याची मुदत काल संपल्याने निवडणूक बिनविरोध झाली. या 17 बिनविरोध झालेल्या संचालकांमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक आहेत.
दीपक शिवराम पटारे, गिरीधर किसनराव असणे, भाऊसाहेब परशुराम बांद्रे, बाबासाहेब चिमणराव गायकवाड, रामभाऊ लक्ष्मण लिप्टे, गणेश आप्पासाहेब मुदगुले, नानासाहेब पेरूची तनपुरे, कैलास भागवत बोर्डे, एकनाथ सोपान गवळी, नानासाहेब पुंजाजी पवार, नानासाहेब भानुदास काळे, सर्जेराव कडूजी आदिक, अजय शांतवन ओहोळ, सविता सतीश पटारे, शीतल सुनील लांडे, यशवंत मुरलीधर गवारे, संजय विश्वनाथ भिसे आदी नवनिर्वाचित संचालकांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रीया ही 15 जानेवारीपर्यंत चालणार असल्याने आणि माघारीची मुदत 15 जानेवारीपर्यंत असल्याने अधिकृत घोषणा 15 जानेवारीला होणार आहे.
परंतु 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज आल्याने आणि अर्ज भरण्याची मुदत संपल्याने वरील सतरा जणांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट होते. निवडणूक निर्णय अधिकारी आर. एस. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता 17 जागांसाठी सतरा उमेदवारी अर्ज आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत कालच संपल्याने अंतिम 17 दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची यादी कालच संस्थेच्या बोर्डावर लावली आहे. 15 जानेवारीला अधिकृत घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले.




