अहमदनगर – प्रा. रोहिणी डावरे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अकोले – अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोलेच्या प्रा. रोहिणी डावरे यांना कबीर नवोदित साहित्य शिरोमणी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गोपाल किरण समाज सेवी संस्थान, ग्वाल्हेर यांच्यावतीने दिला जाणारा कबीर नवोदित साहित्य शिरोमणी हा पुरस्कार अगस्ती, कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोलेच्या प्रा. रोहिणी डावरे यांना छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात देण्यात आला. हिंदी साहित्य क्षेत्रात नवोदित साहित्यकार यांनी राष्ट्रीय पातळीवर केलेल्या विशेष कामगिरी व नैपुण्यावर आधारित हा सन्मान देण्यात आला आहे.
प्रा. रोहिणी डावरे यांचे राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक विषयांमध्ये कविता लेखनात प्रथम क्रमांक आलेले आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कामगिरी , राष्ट्रीय आॅनलाईन साहित्यिक व सामाजिक चर्चासत्रांचे सूत्रसंचालन, संस्कारश्री आॅनलाईन स्टेटस स्पर्धेमधे संस्कारश्री सन्मान इ. विविध कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे..द यांनी अभिनंदन केले आहे.





