नेवासाचे माजी आमदार मुरकुटे आषाढी वारीत झाले सहभागी

राजेंद्र वाघमारे
नेवासा – “पाऊले चालती पंढरीची वाट” या आषाढी वारी दिंडी सोहळ्यात सालाबाद प्रमाणे यावर्षीही नेवासा तालुक्याचे भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे आषाढी वारीसाठी श्रीक्षेञ पंढरपुर पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले असून त्यांचे हे पायी दिंडी सोहळ्यातील २० वे वर्ष अाहे वारकरी संप्रादयातील जयहरी आमदार म्हणून त्यांची अख्खा राज्यात ख्याती निर्माण झालेली आहे त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात माजी आमदार मुरकुटे यांना त्यांच्या नावापेक्षा जयहरी नावानेच ते राज्यात प्रसिद्ध झालेले होते सलग वीस वर्षांपासून त्यांनी अखंडपणे आषाढी वारीत न चुकता सहभागी होण्याचा मान मिळविलेला आहे.
हल्लीच्या जमान्यात बहूतांशी राजकारणी लोक दिंडी वाटे लावण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात उपस्थित राहून वारकऱ्यांसोबत माध्यमांत आपल्या छब्या उमटावून घेत असल्याचा अनुभव सर्वञच दिसून येत असतांना नेवासा तालुक्याचे भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे आषाढी वारीत सहभागी होण्याचे हे थेट २० वे वर्ष असल्यामुळे एक माजी आमदारही पायी दिंडी सोहळ्यात न चुकताही सहभागी होवू शकतो हेच माजी आमदार मुरकुटेंच्या पायी वारी सोहळ्याने राज्यातील वारकऱ्यांना दाखवून दिल्यामुळे त्यांच्या देवगांव (ता.नेवासा) येथील श्रीराम मंदिर ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे खास वैशिष्ठ बनले आहे.





