Video: अहमदनगरमध्ये मतदारांना पैसेवाटप?; शरद पवार गटाकडून ‘ते’ व्हिडीओ शेअर

Ahmednagar Money Distribution । देशभरात आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत असून महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. त्यातच शरदचंद्र पवार गटाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओसह केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अहमदनगरमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा दावा केला आहे.
आज सकाळी ७ वाजता ९६ मतदारसंघांमध्ये सर्व मतदानकेंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट ) यांच्याकडून अहमदनगरमध्ये पैसे वाट्ल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून हे पैसे वाटआल्याचा आरोप मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये पैसे वाटल्याचे दिसत आहे.
हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा?
पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले.. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा?… pic.twitter.com/XdJevKZnXb— Nilesh Lanke – निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) May 12, 2024
आपल्या पोस्टमध्ये निलेश लंके यांनी,”हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा? पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले.. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा? ” असा सवाल त्यांनी केला.
‘उत्तरे’तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात ‘नगर दक्षिणे’त पैशांची धुवांधार बरसात…
(पारनेर)अपेक्षा आहे की, या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील!#धनशक्ती_विरुद्ध_जनशक्ती@ECISVEEP @CEO_Maharashtra pic.twitter.com/a4MLZhiNCL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 13, 2024
तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील हे व्हिडिओ शेअर करत,’उत्तरे’तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात ‘नगर दक्षिणे’त पैशांची धुवांधार बरसात… (पारनेर) अपेक्षा आहे की, या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील!





