अहमदनगर | दोन अल्पवयीन मुलांचे तरुणांकडून अपहरण

राहुरी – कोल्हार खुर्द येथे दोन तरुणांनी अज्ञात कारणासाठी दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याची घटना दि. १२ जून रोजी घडली. या घटनेबाबत दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
संदीप शिरसाठ हे कोल्हार खुर्द येथे त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे परसराम रामदास थोरात, रुद्राक्ष राजेंद्र मोरे, पवन दिलीप डोईफोडे हे शिरसाठ यांच्या मुलाचे मित्र असून, ते नेहमी एक.ित्रत क्रिकेट खेळत असतात. दि. १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान संदीप शिरसाठ यांचा मुलगा विघ्नेश हा क्रिकेट खेळण्यासाठी गावातील मारुती मंदिराकडे जातो, असे सांगुन घरातून बाहेर गेला. रात्री ८ वाजेपर्यंत तो घरी आला नाही. त्याचे नातेवाईक मारुती मंदिराकडे शोध घेत होते.
त्याचवेळी साई प्रकाश कानडे याचे फोनवर विघ्नेश याच्या मित्रांनी फोन करून सांगितले की, आम्ही क्रिकेट ॲकॅडमी लावण्यासाठी जाणार आहे. त्याबाबतची चिठ्ठी आम्ही मारुती मंदिराजवळ ठेवलेली आहे. शिरसाठ यांना मंदिर परिसरात ठेवलेली चिठ्ठी मिळून आली. विघ्नेश शिरसाठ व परसराम थोरात या दोघांचे अपहरण करण्यात आल्याची खात्री झाल्यानंतर संदीप शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र त्रिंबक मोरे, पवन दिलीप डोईफोडे (दोघे रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.





