अहमदनगर | दाढमध्ये वादळाने मोठे नुकसान

राहाता – प्रवरा परिसरातील दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मदत करणाऱ्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याच्या सूचना केल्या.
दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळामध्ये मच्छींद्र काशीनाथ तांबे यांची दुभती गाय, गायांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुनिल दाभाडे यांच्या घरावर झाड पडून घरांचे मोठे आणि गाईच्या गोठ्यासह चार गाई जखमी झाल्या. संतोष गाडेकर आणि सुनील गाडेकर यांच ही या वादळामध्ये मोठे नुकसान झाले आहे. वादळाचा वेग जास्त असल्याने दाढमध्ये अनेक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबरोबरच चारा पिकांसह फळबागेचे नुकसान झाले.
मंत्री विखे पाटील यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागास भेट देऊन शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना दिलासा देऊन अधिकाऱ्यांनी सर्वांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये ३८ जणांचे पंचनामे करण्यात आले. राहिलेले पंचनामे त्वरीत करण्याच्या सूचना देताना वीज पुरवठा आणि नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करा, असे अधिकाऱ्ंयाना सांगितले. यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक सुनिल तांबे, माजी संचालक प्रताप तांबे, अशोक गाडेकर, सरपंच तात्यासाहेब सातपुते, उपसरपंच नकुल तांबे, गोरक्षनाथ तांबे, योगेश तांबे, सुनिल तांबे, भास्कर तांबे, गोकुळ गाडेकर, नायब तहसिलदार हेमंत पाटील, तलाठी विठ्ठल कानडे, मंडळ अधिकारी रमेश झेंडे, पशुवेद्यकीय अधिकारी डाॅ.सतीष शिरसाठ आदी उपस्थित होते.





