Ahmednagar : नागेश विद्यालयातील 1 हजार विद्यार्थ्यांनी साकारले ‘प्रजासत्ताक दिन’ नाव

Updated On:
Ahmednagar : नागेश विद्यालयातील 1 हजार विद्यार्थ्यांनी साकारले ‘प्रजासत्ताक दिन’ नाव

जामखेड (प्रतिनिधी)-  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य सांधून रयत शिक्षण सांस्थेच्या श्री नागेश विद्यालयात सुमारे 1 हजार विद्यार्थ्यांनी 150 फूट लांबीचे व 70 फूट रुंदीचे ‘प्रजासत्ताक दिन’ हे नाव अवघ्या दोन तासात साकारून अनोखा विक्रम केला. नाव पाहण्यासाठी जामखेडकरांची एकच गर्दी केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये 26 जानेवारी 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे 1 हजार विद्यार्थ्यांपासून तयार केलेले प्रजासत्ताक दिन नाव साकारण्यात आले. विद्यालयाचे ध्वजारोहण प्राचार्य मडके बी. के. यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे नागेश विद्यालय युनिट उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना दिली.

प्रजासत्ताक दिन ” या नावाची लांबी असून 10 हजार 500 स्क्वेअर फुट मध्ये नागेश विद्यालयातील 500 विद्यार्थी व कन्या विद्यालयातील 500 विद्यार्थीनी व एनसीसी कॅडेट यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एन सी सी ऑफिसर मयूर भोसले अथक परिश्रम घेतले. त्यांना विद्यालयातील शिक्षक व एनसीसी कॅडेट्स यांचे सहकार्य लाभले. हे नाव अवघ्या दोन तासात तयार झाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती नागेश स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष मधुकर राळेभात , रा कॉ प्रदेश चिटणीस स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र कोठारी ,स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत, स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, प्राचार्य बी के मडके, मुख्याध्यापिका के डी चौधरी सुरेश गोसावी, कृष्णाजी भोसले, उपप्राचार्य पी ए तांबे , पर्यवेक्षक व्ही के कोकाटे , पर्यवेक्षक संजय हजारे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव एनसीसी ऑफिसर मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/republic-day-2023-lets-resolve-to-build-a-strong-maharashtra-governor-bhagat-singh-koshyari/

यावेळी विविध प्रकारचे ध्वज तयार करणारे राधिका इंटरप्राईजेस चे संचालक बाबा घोलप यांनी एक हजार ध्वज विद्यार्थ्यांना मोफत दिले. विद्यार्थ्यांपासून साकारलेले ” प्रजासत्ताक दिन “नाव रयतेच्या श्री नागेश विद्यालय साकारण्यात आले. याबद्दल सर्व जामखेड करा कडून कौतुक होत आहे. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार ,विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेकर, काकासाहेब वाळुंजकर , शिवाजी तापकीर यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले. हे नाव पाहण्यासाठी विद्यालयांमध्ये ग्रामस्थ,पालक शिक्षक,माता भगिनी, माजी सैनिक यांनी हजेरी लावली.

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Jamkhed : खर्डा परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ५.२७ लाखांचा भेसळयुक्त दुध पावडरचा साठा जप्त करून केला नष्ट

2026-10-07 08:59:42

Jamkhed : खर्डा परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ५.२७ लाखांचा भेसळयुक्त दुध पावडरचा साठा जप्त करून केला नष्ट

Junnar News: 'चांदीची मोड द्या, दागिने घ्या...' बहाणा करून महिलांनी मारला डल्ला? बेल्ह्यातील धक्कादायक प्रकार

2026-09-11 05:00:25

Junnar News: 'चांदीची मोड द्या, दागिने घ्या...' बहाणा करून महिलांनी मारला डल्ला? बेल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Reserve Bank of India : RBIकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध; खात्यातून रक्कम काढता येणार नाही

2026-08-30 14:31:36

Reserve Bank of India : RBIकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध; खात्यातून रक्कम काढता येणार नाही

Tukaram Mundhe : आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री होणार.! काय आहे प्रकरण?

2026-08-16 16:04:24

Tukaram Mundhe : आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री होणार.! काय आहे प्रकरण?