अहमदनगर: संसर्ग टाळण्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या सीमा झाल्या बंद

येवला-मालेगाव ये-जा करणाऱ्यावर प्रशासनाची करडी नजर
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्याला येवला – मालेगाव, औरंगाबाद, नाशिक पासुन करोना संसर्गजन्य आजाराचा धोका ज्यास्त असल्याने तालुक्याच्या सीमा भागात पोलीस पथके व गावपातळीवर स्वतंत्र पथकांची नियुक्ती करुन विषेशतः मालेगाव- येवला येथुन कोपरगाव तालुक्यात कोणीही सहजासहजी येणार नाही याची दक्षता महसूल व पोलीस प्रशासनाने घेतली आहे. संपुर्ण तालुक्यातील मुख्य रस्त्यावर करड नजर ठेवण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली .
ते पुढे म्हणाले कि, सध्या जीवनावश्यक वस्तुच्या नावाखाली अनेक वाहनातुन मालाची वाहतूक केली जात आहे त्याचा गैर फायदा घेवून छुप्या पध्दतीने प्रवाशी वाहतूक होते. विषेशतः मालेगावचे नागरीक येवल्यात येतात तर येवल्याचे नागरी कोपरगावात विविध व्यवसाय व फळे, पालेभाज्या खरेदी विक्रीसाठी ये जा करीत असतात. या माध्यमातून कोपरगाव तालुक्याला करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. इतर शहरातुन दररोज ५० ते ६० नागरीक छुप्या पध्दतीने येत असल्याचे तपासाअंती उघड होत आहे त्यामुळे सध्या कोपरगाव तालुक्यात एकही करोनाबाधीत रुग्ण नसला तरी शेजारच्या तालुक्यातुन संसर्ग होवु शकतो तेव्हा नागरीकांनी या बाधीत भागातील नागरीकांचा संपर्क टाळण्यासाठी मालेगाव, येवला, औरंगाबाद येथील नागरीक, नातेवाईक, व्यवसायीक यांच्याशी सध्यातरी संपर्क करू नये असे आवहान केले आहे. जर कोणी सीमा तोडून विनाकारण ये-जा करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, पोलीसांनी जागोजागी चेकपोस्ट लावले असुन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी रात्रीची गस्त शहरासह तालुक्यात वाढवली आहे. सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी साध्या वेशात आपल्या पथकासह रस्त्यावर उभे राहुन विनाकारण फिरणाऱ्या चांगलाच चोप दिला. तर अनेकावर गुन्हा दाखल करून पोलीसी खाक्या दाखवला. शहरात रात्री गाड्या घेवून फिरणाऱ्यांना मानगावकर यांनी चांगलेच वठणीवर आणले. मुख्य रोड, इंदिरापथ, निवारा रोड, सुभद्रनगर परिसराती अनेकांना मानगावकर प्रसाद मिळाल्याने रात्रभर त्यांच्याच प्रसादाची चर्चा सुरू होती.
तेव्हा नागरीकांनी बाहेर न पडता घरात बसुन परिवार सुखी ठेवा अन्यथा करोनाची बाधा किंवा पोलीसांचा प्रसाद यापैकी एक नक्की मिळणार. तोंडाला मास्क किंवा रुमाल नाही बांधलात आणि रस्त्यावर फिरतान दिसलात तर ५०० रूपये दंड भरावा लागेल त्यासाठी पालीकेचे कर्मचारी प्रत्येक रस्त्यावर लक्ष ठेवून आहेत.





