अहमदनगर – श्रीगोंदा उपोषण अवैध होर्डिंग्ज हटविण्यासाठी उपोषण सुरू
Updated On:

श्रीगोंदा – शहरातील सर्वच होर्डिंग्ज बेकायदेशीर असून ते हटविण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.३०) चर्मकार ऐक्य महिला परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मीरा शिंदे यांनी नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
मीरा शिंदे म्हणाल्या, शहरातील होर्डिंग्ज बेकायदेशीर व धोकादायक असल्याने ते तत्काळ हटविण्याची मागणी आपण नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. परंतु, त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. सदर होर्डिंग्ज काढून होर्डिंग्जधारकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच काढलेले होर्डिंग्ज पुन्हा लागणार नाहीत, याची हमी नगरपरिषदेकडून मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे. उपोषणाला भगवान गोरखे, अरविंद कापसे, नाना शिंदे, शाम जरे, सतीश बोरुडे, कालिदास कोथिंबीरे, सोनू कोथिंबीरे आदींनी पाठिंबा दिला.





