अहमदाबाद विमान दुर्घटना : मुलीला सरप्राईज देण्यासाठी निघाले पण आई-वडिलांचा प्रवास ठरला अखेरचा…

Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद मधील दुर्घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि मेघानीनगर परिसरातील २४ रहिवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. यातील अनेक दु:खद घटना समोर येत आहेत. यामध्ये अहमदाबाद येथील पंड्या कुटुंबातील पती-पत्नीचा मृत्यू झाला. मात्र त्यांची मनं सुन्न करणारी कहाणी समोर आली आहे.
पंड्या कुटुंबातील मुलगा आणि मुलगी हे दोघेही शिक्षणासाठी लंडनला आहेत, आपल्या मुलीला सरप्राईज देण्यासाठी पती-पत्नी लंडनला तिकीट काढून फ्लाईटने निघाले होते. पंड्याची मुलगी नोकरी करते, तर मुलगा शिक्षण घेत होता. मुलाचा नुकताच रिझल्ट लागल्यानंतर त्याच्या पदवीदान सोहळ्यास सहभागी होण्यासाठी हे दोघेही लंडनाला निघाले होते. आई-वडिल येणार असल्याचे मुलाला माहिती होते, पण मुलीला माहिती नव्हते. Ahmedabad Plane Crash |
मात्र, काल दुपारी लंडनला जाणारं हेच विमान कोसळलं आणि त्यात पंड्या पती-पत्नीचा मृत्यू झाला. पंड्या कुटुंबीयांवर या अपघाताने शोककळा पसरली असून ज्या लेकरांना भेटण्यासाठी आई-वडिल लंडनला निघाले होते, आता तिच दोन्ही मुले आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मायदेशी परतत आहेत. Ahmedabad Plane Crash |
महाराष्ट्रातील १२ जणांचा मृत्यू
या अपघातात महाराष्ट्रातील १२ जणांचा मृत्यू झाला, यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल, क्रू मेंबर्स दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती आणि प्रवासी मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार यांचा समावेश आहे. ऐश्वर्याच्या सुटकेने अकोल्याला दिलासा मिळाला, पण इतर कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. Ahmedabad Plane Crash |
हेही वाचा :
“भाजपला ठाकरे बंधूंना एकत्र येऊ द्यायचे नाही,” काँग्रेस नेत्याने कारणंही सांगितले…




