Ahilyanagar : शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणाने काहींना विशेषतः जुन्या मंडळींना आनंद झाला असून, काहींच्या पदरी नाराजी पडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्साह आणि नाराजीचे संमिश्र वातावरण आहे. काही प्रभागांमध्ये इच्छुकांना आपल्यासाठी आरक्षण मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे, तर काही ठिकाणी अपेक्षाभंग झाल्याने निराशा व्यक्त होत आहे. या आरक्षणामुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे आहेत.
काही जुन्या चेहऱ्यांना या आरक्षणामुळे पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. अनेकांचा उमेदवारी करण्याचा पक्का इरादा असून ही कोणत्या पक्षाकडून हे निश्चित नाही. त्यामुळे तिकीट ज्याच्याकडून मिळेल तो पक्ष अशी आज तरी त्यांची भूमिका आहे .
शेवगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हा विशेष भूसंपादन अधिकारी सुभाष दळवी यांचे उपस्थितीत नगरपरिषद मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. छोट्या मुलींच्या हातून चिठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.
प्रभागनिहाय जाहीर झालेले आरक्षण : प्रभाग १: अ अनुसूचित जाती, सर्वसाधारण, ब सर्वसाधारण (स्त्री), प्रभाग २: अ नागरी परिषद सर्वAसाधारण (स्त्री), ब सर्वसाधारण, प्रभाग ३: अ सर्वसाधारण (ना.पा) , ब खुला महिला, प्रभाग ४: अ नागरी परिषद (स्त्री), ब सर्वसाधारण खुला, प्रभाग ५: अ अनुसूचित जाती (सर्वसाधारण), ब सर्वसाधारण खुला (स्त्री),प्रभाग ६: अ सर्वसाधारण (ना.पा.), ब खुला महिला, प्रभाग ७: अ सर्वसाधारण (स्त्री), ब सर्वसाधारण, प्रभाग ८: अ सर्वसाधारण (ना.पा.), ब सर्वसाधारण (स्त्री),प्रभाग ९: अ अनुसूचित जाती (महिला), ब सर्वसाधारण, प्रभाग १०: अ अनुसूचित जाती (महिला) ब) सर्वसाधारण प्रभाग ११: अ सर्वसाधारण (महिला), ब सर्वसाधारण (खुला), प्रभाग १२: अ ना .मा. प्र, ब सर्वसाधारण.

