अर्थसंकल्पापूर्वी आजपासून ‘या’ नियमांत झाले बदल; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Rule Changes From 1st Feb | अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करणार आहेत. विशेष म्हणजे त्या सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. मात्र बजेट सादर होण्यापूर्वी आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून असे अनेक बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर होणार आहे.
एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घट
1 फेब्रुवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी नवीन दर लागू झाले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली आहे. आजपासून दिल्ली गॅस सिलेंडरची किंमत 1804 रुपयांवरून 1979 रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली असली तरीही घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
यूपीआय नियमांमध्ये बदल
आजपासून यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) काही यूपीआय व्यवहार ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून स्पेशल कॅरेक्टरसह तयार करण्यात आलेल्या आयडीद्वारे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. तर ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स (अक्षरं आणि अंक) वापरले जातील. याव्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही विशेष अक्षरांचा (@, #, $, %) वापर केल्यास UPI ID रद्द होऊ शकतो.
बँकेच्या नियमात बदल
1 फेब्रुवारी 2025 पासून बँकिंग नियमांमध्ये एक बदल म्हणजे कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांसाठी एटीएमशी संबंधित नियम बदलणार आहे. ग्राहकांसाठी सामान्य सुविधांसह शुल्कात बदल होणार आहेत. विविध प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी शुल्क बँकेकडून ठरवले जाईल. यातील मुख्य बदल म्हणजे एटीएम व्यवहारांची मोफत मर्यादा कमी करण्यात येणार आहे आणि इतर बँकिंग सेवांच्या शुल्कात वाढ केली जाणार आहे.
ATF च्या किमतीत बदल
1 फेब्रुवारीपासून एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एअर टर्बाइन इंधनाच्या किमती सुधारतात. याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.
मारुती सुझुकीच्या कार महाग
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं (एमएसआयएल) वाढता इनपुट कॉस्ट आणि ऑपरेटिंग खर्च लक्षात घेता १ फेब्रुवारीपासून आपल्या मॉडेल्सच्या किंमतीत ३२,५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ऑल्टो के१०, एस-प्रेसो, सेलेरियो, वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा, अर्टिगा, इको, इग्निस, बलेनो, सियाज, एक्सएल ६, फ्रँक्स, इनव्हिक्टो, जिम्नी आणि ग्रँड व्हिटारा या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ होणार आहे.
हेही वाचा:





