पुणे जिल्हा | शेती कमी खर्चाची असावी

बारामती, (प्रतिनिधी) – शेती करताना ती कमी खर्चाची असावी गरजेवर, अधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असावी. निसर्गाचे चक्र उलट सुलट होत आहे. अडाणीपणाची शेती आपणास काही देणार नाही. शेतीमध्ये महिलाच जास्त वेळ देतात पुरुष कमी वेळ देतात.
कृषी विज्ञान केंद्राकडे लाखो शेतकरी जोडले आहेत. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय महिला उत्कृष्ट करतात, असे मत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
काटी (ता. इंदापूर) येथील 550 महिला व यशदाचे 40 सरपंच यांनी कृषी विज्ञान केंद्रला भेट दिली. यावेळी मार्गदर्शनपर सुनंदा पवार बोलत होत्या.
यावेळी काटीचे सरपंच सोमनाथ मोहिते, ग्रामसेवक संतोष मोहिते, कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ संतोष गोडसे, यशदाचे बिराजदार, फॉर्म मॅनेजर महेश जाधव, कृष्णा तावरे हे उपस्थित होते.
सुनंदा पवार म्हणाल्या की म्हणाल्या की, पुढील 10 वर्षांत 70 टक्के लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे. आपल्या देशाचा एक्सपोर्टही कमी होत आहे कारण शेतीमालात विषरी घटक सापडत आहेत. तसेच लघु उद्योगांमध्ये 35 ते 40 हजार महिलांना उभा केला आहे.
जलसंधारणामुळे 80 गावांमध्ये टँकर बंद झाले आहे. महिला आरक्षणामुळे अनेक महिला सरपंच होत आहेत त्यांनाही सोन्यासारखी संधी आहे, रिमोट कंट्रोल तुमच्या हातात पाहिजे फक्त सही पुरते सरपंच नको ग्रामपंचायत सारख्या निवडणुकीमध्ये लाखो करोडो रुपये खर्च होऊ लागले आहे ते योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
संतोष गोडसे यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच 110 एकर वरील असलेले विविध उपक्रम सर्व महिलांना दाखवण्यासाठी आकाश वळकुंदे, महेश जाधव, पोपट गावडे, धनंजय जगताप यांनी मार्गदर्शन केले.
महिला जास्त वेळ टीव्ही, मोबाइलमध्ये घालवतात
महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत ती कुटुंबाचा मधला खांब महिला असते ती असेपर्यंत तिची किंमत कळत नाही नंतर कळते. बदलापूर किंवा कलकत्त्यासारख्या घटना आपल्या घरात, परिसरात घडणार नाही याची काळजी आपण घ्यावी.
कोणताही व्यवसाय करताना त्याचे प्रशिक्षण घ्या. महिला जास्त वेळ टीव्ही पुढे मालिका बघण्यात घालवतात किंवा मोबाइलमध्ये घालवता ते योग्य नाही. त्यांनी मुलींना गुड टच बॅड टचबाबत तसेच मासिक पाळीबाबत व इतर समस्याबाबत आईने सांगावे, मुलगा मुलगी असा फरक करू नका,





