Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

Rohit Pawar : नुकतेच राज्याचे पावसाळी अधिवेशन संपले आहे. ३० जूनपासून सुरूवात झालेल्या या अधिवेशनात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. काही मोठे निर्णयही घेण्यात आले. मात्र, लोकांच्या प्रश्नांपेक्षा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोप फैरींनी अधिवेशन चर्चेत राहिले.
हे कमी काय म्हणून आव्हाड आणि पडळकर यांच्यातील शाब्दिक चकमकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतली. थेट विधानभवनाच्या प्रवेशाद्वारावर दोघांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवरच रमीचा डाव मांडल्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, असं व्हिडीओ शेअर रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
कृषीमंत्र्यांच्या सभागृहातील या व्हिडीओमुळे नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.
रोहित पवारांची पोस्ट
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?
हेही वाचा : झेलेन्स्कीची नरमाईची भूमिका ! पुतिन यांना दिली युद्धबंदीच्या वाटाघाटीची ऑफर, अमेरिकेविषयी केले ‘हे’ विधान





