कृषीमंत्री सत्तारांनी अधिकाऱ्याला विचारलं दारू पिता का? अधिकारी म्हणाले, कधी कधी थोडी…, व्हिडीओची जोरदार चर्चा

बीड – अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करत आहेत. मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. यावरून शेतकरी संतप्त आहेत. दरम्यान, सत्तार यांच्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. अतिवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर कृषी मंत्री सत्तार आणि अधिकाऱ्यांमध्ये दारूच्या चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळाले, यावरून शेतकरी अधिकच संतप्त झाले आहेत.
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्वांसमोर जिल्हा अधिकारी यांना विचाले की, दारू घेता का? यावर जिल्हा अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे कधी कधी थोडी घेतो, असे उत्तर दिले. जिल्हा अधिकारी राधा विनोद शर्मा आणि कृषी मंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
‘उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला इथं पाठवलंय’; आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर https://t.co/kozQ56yt2h
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 27, 2022
दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले प्रमुख पीक सोयाबीन जास्त पडलेल्या पावसामुळे मातीमोल झाले. अनेकांनी काढून ठेवलेले सोयाबिन पावसामुळे पुन्हा उगवले. गुडघाभर पाण्यात सोयाबीन भीजत होते. सोयाबीनसह इतरही पीकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना, कृषीमंत्र्यांच्या असा व्हिडीओ समोर आल्याने त्यांना जनतेची किती काळजी आहे यावरून उलटसूलट चर्चांना उधाण आले आहे.





