Nevasa : सुलतानपुर येथे कृषिदूतांनी केली शालेय वारकऱ्यांसमवेत आषाढी एकादशी साजरी!

नेवासा : सोनई येथील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी सुलतानपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोषाख घालून विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेला फुलांनी सजवले. यावेळी शिक्षकांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले आणि विठोबावर आधारित कथा सांगितल्या.
विद्यार्थ्यांनी “विठ्ठल-विठ्ठल”च्या गजरात भजन सादर केले काही विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीवर भाषण केले. किर्तन आणि अभंग गायनाचे कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भक्ती, एकता आणि संस्कृतीची ओळख मिळाली.
मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या आवारात साऱ्यांनी एकत्र येऊन “पुंडलीक वरदा हरिविठ्ठल”चा गजर केला. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी व कृषीदूतांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे आयोजन कृषिदूत वरूण गारुळे ,निखिल दिघे ,आदित्य लोंढेपाटील, ओंकार कामठे ,रुपेश कदम, युवराज हाके यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य सुनील बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.





