पुणे जिल्हा | शिक्रापुरात आव्हाडांविरोधात आंदोलन

शिक्रापूर, (वार्ताहर)- राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडल्याने त्यांच्या या कृत्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करीत आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिक्रापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, जिल्हाध्यक्ष संदीप सातव, किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ, दिलीप शेलार, मारुती रणबावळे, प्रवीण फडतरे,
आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, बाळासाहेब चव्हाण, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, भाग्यश्री गायकवाड, सूरज चव्हाण, गोरक्ष काळे, चंद्रशेखर दरवडे, संभाजी जाधव, स्वप्नील धायरकर उपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ, दिलीप शेलार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांसह आदींनी मनोगत व्यक्त केले.





