नवी दिल्ली – एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नईने 5 गडी राखून विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यानंतर सीएसके व्यवस्थापन ट्रॉफीसह चेन्नईतील तिरुपती मंदिरात पोहचल्याच पाहायला मिळाल. यावेळेसचा तिरुपती मंदिरातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील IPL 2023 चा अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळला गेला. राखीव दिवशीही पावसाने खेळावर परिणाम केला. अखेर निर्धारित ओव्हर्सची मॅच झाली आणि चेन्नईने बाजी मारली.
चेन्नईने पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकल्यानंतर चेन्नईच्या व्यवस्थापकांनी ही ट्रॉफी तिरुपती बालाजी चरणी ठेवल्याचे पाहायला मिळते. यावेळी व्हिडिओमध्ये व्यवस्थापक चेन्नईच्या जर्सीसह ट्रॉफी हातात घेऊन गाभाऱ्यात प्रवेश करताना दिसतात. ते तेथील पुजाऱ्यांच्या हातात ट्रॉफी देतात आणि पुजारी बालाजी चरणी ट्रॉफी ठेवत त्याला पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत.
CSK ने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साई सुदर्शनच्या (96) आक्रमक खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. यानंतर चेन्नईच्या डावात पहिल्या चेंडू नंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला.
#NEWSUPDATE : ஐபிஎல் கோப்பையுடன் தி.நகர் பெருமாள் கோவிலுக்கு வந்த CSK நிர்வாகம்#IPLTrophy #IPL2023Final #CSK #Chennai #NewsTamil24x7 pic.twitter.com/9dGkMNB4i2
— News Tamil 24×7 | நியூஸ் தமிழ் 24×7 (@NewsTamilTV24x7) May 30, 2023
पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा सीएसकेला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले. फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर सीएसकेने शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली. दोन बॉल दहा रन्स हवे असताना जडेजाने एक सिक्सर आणि एक फोर मारत चेन्नईसाठी विजय खेचून आणला.