छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकी कोणत्या विषयावर झाली चर्चा?

Sharad Pawar And Chhagan Bhujbal | बारामतीत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज सोमवारी अचानक छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आज सकाळी भुजबळ शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. मात्र तब्बल दीड तासांच्या वेटिंगनंतर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर छगन भुजबळ यांनी या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याची माहिती पत्रकार परिषद घेत दिली आहे.
भुजबळ – पवार भेटीत काय चर्चा झाली?
या भेटीमध्ये राजकारणाचा कोणताही मुद्दा नव्हता. आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी मी कोणालाही भेटायला तयार असून यावर मार्ग कसा काढायचा याबाबत चर्चा केल्याचे सांगितले. “मी कोणतंही राजकारण घेऊन मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. कोणतीही पक्षीय भूमिका नाही. पण महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही राबवले आणि आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे कीराज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे,” असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
“राज्यात ओबीसी आरक्षण देण्याच काम पवारांनी केले. आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती आहे. मी त्यांना विनंती केली की तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. जातीजातींमध्ये वातावरण शांत राहवे यासाठी तिथे शरद पवार असले पाहिजे, अशी माझी मागणी होती,” असं छगन भुजबळ म्हणाले. Sharad Pawar And Chhagan Bhujbal |
शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
याबाबत ते पुढे म्हणाले की, मराठा, ओबीसी धनगर यांच्या मागण्या काय आहेत? त्या मी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. मराठा, ओबीसी नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे मला माहिती नाहीत असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा करेन, असे शरद पवार म्हणाल्याचे भुजबळ म्हणाले. Sharad Pawar And Chhagan Bhujbal |
हेही वाचा:





