उद्धव ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीसांचीही राज ठाकरेंच्या घरी भेट; गणरायचं घेतलं दर्शन
Raj Thackeray | गणेशोत्सवानिमित्त काल 27 ऑगस्ट रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादर येथील निवासस्थानी भेट दिली. या भेटीची चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणरायचं दर्शन घेतलं. फडणवीस यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आहे. या दरम्यान या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता
विघ्न विनाशक गणराया!मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
(📍मुंबई । 27-8-2025)@RajThackeray#Maharashtra… pic.twitter.com/T0SifENyG7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 27, 2025
गणपतीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
गेल्या 22 वर्षांपासून राजकीय आणि कौटुंबिकदृष्ट्या दूर असलेले चुलत बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गणपतीच्या निमित्ताने एकत्र आले. मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट दिली. तब्बल 2 तास दोन्ही कुटुंबीय एकत्र होते. Raj Thackeray |
एकीकडे उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे गट एकत्र येऊन बीएमसी निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, पण अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, फडणवीस यांची राज ठाकरे यांच्यासोबतची जवळीक शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते. मात्र आगामी निवडणुकीत दोन भावांचं मनोमीलन कायम राहणार की महायुतीसोबत राज ठाकरे जातात हे पाहणं रंजक ठरणार आहे. Raj Thackeray |
हेही वाचा:
“भारतासाठी हा Wakeup call” ; ट्रम्पचा उल्लेख करत आरबीआयच्या माजी गव्हर्नरचे मोठे विधान





