सोहम शाह पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सिनेमाचे पहिलं पोस्टर रिलीज

Crazxy Movie Teaser | निर्माते आणि अभिनेता सोहम शाह ‘तुंबाड’ सिनेमामुळे चर्चेत आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केले होती. या सिनेमानंतर आता सोहम शाह यांच्या नवीन सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘क्रेझी’ असे या सिनेमाचे नाव आहे.
सोहम शाह यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सोहम शाह सुटाबुटमध्ये दिसत असून त्यांच्या खांद्यावर पैशांनी भरलेली बॅग पाहायला मिळते. सोहम यांनी हटके पोज देऊन हे पोस्टर शूट केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरकडे पाहता काहीतरी नवीन घडणार असल्याचे लक्षात येते.
पोस्टरच्या रिलीझनंतर, चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आज या चित्रपटाचा त्याचा टीझर रिलीज होणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
View this post on Instagram
सोहम शाह निर्मित गिरीश कोहली दिग्दर्शित हा सिनेमा २८ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. सोहम शाह यांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. मात्र त्यांच्यासोबत कोणते कलाकार पाहायला मिळणार हे देखील आता समोर येणार आहे. Crazxy Movie Teaser |
हेही वाचा:
“…तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल” ; धनंजय मुंडेंसाठी आता लक्ष्मण हाके मैदानात





