‘हनुमान’ चित्रपटाच्या यशानंतर नवरात्रीनिमित्त ‘महाकाली’ चित्रपटाची घोषणा

Mahakali Film | दिग्दर्शक प्रशांत वर्माचा ‘हनुमान’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर त्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर त्याने ‘महाकाली’ या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे.
युनिवर्समध्ये आणखी एक पॉवरफुल शक्तीचा सहभाग होतोय, अशी घोषणा करुन प्रशांत वर्माने ‘महाकाली’ सिनेमाचं पोस्टर दाखवतात. या पोस्टरमध्ये वाघाला मिठी मारणारी एक छोटी मुलगी दिसते.
दरम्यान, या चित्रपटाची कथा आणि यात कोणते कलाकार पाहायला मिळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दसऱ्याला या सिनेमाचा आणखी एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
View this post on Instagram
दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका पूजा कोल्लुरू ‘महाकाली’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. प्रशांत वर्मा आरकेडी स्टुडिओच्या सहकार्याने हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाची घोषणा होताच प्रशांतचे अभिनंदन करत आहेत. तसेच अनेकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.





