Dilip Bhoir joins Shindesena | भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी अलिबाग मतदार संघातून बंडखोरी केली होती. यानंतर आता दिलीप भोईर यांनी शिवसनेते प्रवेश केला आहे. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये भोईर यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी करत दिलीप भोईर यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवली होती. बंडखोरी केल्यामुळे दिलीप भोईर यांच्यावर भाजपने कारवाई केली होती. यातच आता दिलीप भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची ताकद अधिक मजबूत होणार आहे. Dilip Bhoir joins Shindesena | महायुतीच्या जागा वाटपात येथील जागा शिवसेनेला गेल्याने दिलीप भोईर यांची निराशा झाली. त्यानंतर, भोईर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान, अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी संध्याकाळी अलिबाग येथे एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. भोईर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत ३३ हजार मतं मिळवली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. Dilip Bhoir joins Shindesena | हेही वाचा : कर्जमाफी करण्याचा निर्णय योग्यवेळी घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस