पंतप्रधानानंतर गृहमंत्री अमित शाहांनी दिल्या मराठीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – आषाढी एकादशी निमित्त सर्वीकडे भक्तीमय वातावरण आहे. देशभरातून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्वानी मराठी मध्ये शुभेच्छा दिल्या आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मराठीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवभाव॥टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलभक्तांची पायी वारी व संत संप्रदायाच्या शिकवणीचा महान वारसा असलेली वारकरी परंपरा अशीच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छेसह सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.
बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल…श्री ज्ञानदेव तुकाराम— Amit Shah (@AmitShah) July 20, 2021
गृहमंत्री अमित शाह यांनी मराठीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा म्हणाले की, ”बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव॥”
”टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलभक्तांची पायी वारी व संत संप्रदायाच्या शिकवणीचा महान वारसा असलेली वारकरी परंपरा अशीच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छेसह सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल…श्री ज्ञानदेव तुकाराम”
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया.
वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देताना म्हणाले की, ”आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.”
आषाढ़ी एकादशी निमित्त विठुरायाला त्रिवार वंदन व सर्वांना आषाढ़ी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 20, 2021
”आषाढ़ी एकादशी निमित्त विठुरायाला त्रिवार वंदन व सर्वांना आषाढ़ी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा।” या शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.





