“महापालिका निवडणुका झाल्यावर…” लाडकी बहिण योजनेवरून विनायक राऊतांचा मोठा दावा

MP Vinayak Raut | महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या योजनेचा अनेक महिलांना फायदा होत आहे. मात्र या योजनेवरून विरोधकांकडून टीका देखील केली जाते. लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्र कर्जात डुबलेला आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान अजित पवार कसे पेलणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा प्रयोग ते नक्की करतील. त्यानंतर ही योजना बंद पाडतील. या योजनेचा डोलारा सांभाळणे जिकरीचे काम आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की ही योजना बंद करण्यात येतील,” असा मोठा दावा विनायक राऊत यांनी केला. MP Vinayak Raut |
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट कंबर कसून तयारीला लागला आहे. उद्धव ठाकरे जातीने सर्व गोष्टींचा आढावा आणि बैठका घेत आहेत. यातच आता ठाकरे गटातील खासदाराने लाडकी बहीण योजनेवरून केलेला दावा चर्चेत आलेला आहे. MP Vinayak Raut |





