बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर ‘या’ लोकांनी सरकारकडे मागितली सुरक्षा

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिट लिस्टमध्ये सलमान खानसह आणखी काही लोकं आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने एक यादी तयार केली आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचे पुढील लक्ष्य कोण आहेत हे सांगण्यात आले आहे.
बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहेत ‘ही’ लोकं
लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या यादीत सलमान खानचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच झीशान सिद्दिकी, मुनावर फारुकी, शगनप्रीत सिंग, कौशल चौधरी आणि अमित डागर हेदेखील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी अनेक राज्यांमध्ये पसरली आहे. या टोळीत 700 हून अधिक शुटर्स असल्याचे समजत आहे. लॉरेन्स बिश्नोईला स्वतःची डी-कंपनी स्थापन करायची आहे. जेणेकरून तो त्याची दहशत निर्माण करु शकेल.




