Accident : ज्ञानोबा माऊलीच्या पालखीनंतर आता तुकोबांच्या पालखीमध्ये अपघात; दोन वारकरी गंभीर जखमी
Accident : यंदाच्या वारीत अपघाताची मालिका सुरूच; बारामतीतील गवळ्याची उंडवडी येथे वारकऱ्यांचा अपघात

नवनाथ बोरकर
डोर्लेवाडी : जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखीमध्ये तीन महिला वारकऱ्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. तर काही जण जखमी झाले. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा बारामतीतील गवळ्याची उंडवडी याठिकाणी तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा अपघात झाला आहे.
वेगवेगळ्या अपघातात दोन वारकरी गंभीर जखमी
सुग्रीव गोंडगे रा. लातूर आणि सुरेश जामखंडे रा. कर्नाटक अशी या दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सायंकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळे अपघात झाले आहेत. सुग्रीव गोंडगे रा. लातूर, या वारकऱ्याला तुकोबांच्या पालखीत असलेल्या दिंडीतील ट्रकने उडवले.
तर सुरेश जामखंडे रा. कर्नाटक यांना रस्ता क्रॉस करत असताना मोटार सायकलने उडवले. या दोन्ही वेगवेगळ्या अपघातात दोन्ही वारकरी गंभीर जखमी झाले आहेत यामुळे वारकऱ्यांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून चिंता पसरली आहे..
माऊलींची आणि तुकोबांच्या पालखीने पंढरपूर कडे जाण्यासाठी सध्या अर्धा टप्पा पार केला आहे. अर्धा टप्पा बाकी आहे, यामुळे इथून पुढे तरी दिंडीतील वाहन चालकांनी आपली वाहने सुरक्षित चालवावीत. त्याचबरोबर वारकऱ्यांनी देखील रस्त्यावरून चालताना बेसावधपणे न चालता रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणे गरजेचे आहे. जेणेकरून अपघात होणार नाही, याचबरोबर पोलिसांनी देखील वारंवार वारकऱ्यांना सूचना देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा:





