मोठ्या यशानंतर ‘अल्याड पल्याड 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Alyad Palyad 2 | ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर ‘अल्याड पल्याड 2’ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर आणि दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी ‘अल्याड पल्याड 2’ची घोषणा केली आहे. ‘प्रेक्षकांना पुन्हा घाबरवायची सोय झाली… अल्याड पल्याड २ येतोय,’ असे पोस्टरला कॅप्शन देण्यात आले आहे. पुढील वर्षी जून महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे देखील यातून सांगण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या भागात मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक,सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यमजैन, अनुष्का पिंपुटकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. आता दुसऱ्या कोणते नवे कलाकार असणार हे देखील पहावे लागणार आहे.
दरम्यान, ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाने आठ दिवसांत एकूण 1 कोटी 51 लाख रुपयांचा गल्ला जमवले. भीतीसोबतच या चित्रपटाला विनोदाची जोड देण्यात आल्याने प्रेक्षकांच्या हा चित्रपट अधिक पसंत पडत आहे. एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. या चित्रपटाच्या यशानंतर दुसरा भाग पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत.
हेही वाचा:
“हाथरस दुर्घटनेला सरकार गांभीर्याने घेतंय” ; रिता बहुगुणा जोशी यांची प्रतिक्रिया





